Parbhani MNS Sachin Patil Death Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News : मनसे शहराध्यक्षाची हत्या; धक्कादायक घटनेनं परभणी हादरली

परभणीचे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली.

राजेश काटकर

Parbhani Crime News : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणीचे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली. प्राथामिक माहितीनुसार किरकोळ वादातून त्यांच्या मित्रानेच ही हत्या केली. घटनेचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये. या प्रकरणाचा तपास नवा मोंढा पोलिसांनी सुरू केला आहे. (Parbhani MNS Sachin Patil Death)

प्राथामिक माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सचिन पाटील आणि त्यांचे मित्र परभणी शहरातील शिवराम नगर येथे शिवराम चित्र मंदिरच्या शेजारी गप्पा मारत बसले होते. गप्पा दरम्यान एका मित्रा सोबत सचिन पाटील यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी झालं.

यावेळी समोरील मित्रांनी पाटील यांना सोबत असलेल्या चाकूने भोसकले. त्यात सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Edited By - Satish Daud

मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परभणी शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सचिन पाटील यांच्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासामधून हत्येचं खरं कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT