Maharashtra Bandh 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Bandh : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, महाराष्ट्र बंदची हाक

Parbhani Protest, Maharashtra Bandh : परभणीतील हिंसाचार घटनेच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदला ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Bandh News : परभणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर असलेल्या संविधान प्रतिमेची तडफोडीमुळे वादंग झाला होता. दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या परभणी बंद दरम्यान हिंसाचार झाला होता, त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. त्यामधील सोमनाथ सूर्यवंशी (. ३५) या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्य झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची आज हाक देण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बीड, परभणी, नांदेड, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये बंदला समिश्र पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे. सचिन खरात यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदला शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आलाय. अंबादास दानवे यांनी या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी केली.

संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला, तो वाचवण्यासाठी तो रस्त्यावर आला. त्याच्या मृत्यूची जबाबदारी फडणवीस यांची आहे. आंबेडकरी जनता नाराज आहे पण त्यांनी शांततेत आंदोलन करावं.
संजय राऊत, शिवसेना(UBT), खासदार
परभणीतील घटना चुकीची आहे. पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ज्याचा मृत्यू झाला आहे, तो हार्ट अटॅकने झालाय, अशी माहिती आहे. आज बंद आहे, उद्यापासून सर्व पूर्वपदावर येईल. लोकांनी कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे.असा उद्रेक लोकांनी करू नये, सर्वांनी शांतता राखावी.
मेघना बोर्डीकर, मंत्री

प्रकरण काय आहे ?

परभणी बंदवेळी झालेल्या हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात 35 वर्षे एका तरुणाचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला. छातीत कळ आल्याने या तरुणास दवाखान्यात नेण्यात आले, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. पण हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात अंबेडकरवाद्यांकडून करण्यात आला. त्यामुळे परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झालेय. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

परभणी घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हा बंदची हाक

परभणी घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यात उमटत आहेत.आज विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटनांनी नांदेड बंदची हाक दिलीय. नांदेडच्या अर्धापूर ते निर्मल महामार्गावर विविध सामाजिक संघटनेने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करत परभणी घटनेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT