Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पती मनोरुग्ण असल्‍याने महिलेस पाठवण्यास नातेवाईकांचा होता नकार; लग्‍नाचे कारण सांगत आणले अन्‌

पती मनोरुग्ण असल्‍याने महिलेस पाठवण्यास नातेवाईकांचा होता नकार; लग्‍नाचे कारण सांगत आणले अन्‌

राजेश काटकर

परभणी : जिंतूर शहरातील जालना रोड परिसरातील रमाबाईनगर परिसरातील एका महिलेच्या पतीने गळ्याला पट्ट्याने बांधून तिची हत्या (Crime News) केल्याची दुर्दैवी घटना आज (१३ मार्च) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे (Parbhani News) शहरात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

परभणी शहरातील जालना रोडवरील रमाबाईनगर येथील रहिवाशी राजू अवचर हे मागील वास्‍तव्‍यास आहे. काही दिवसांपासून मनोरुग्ण असल्यामुळे राजू अवचर हा औरंगाबाद येथे उपचार घेत होता. घटनेचा काही दिवस अगोदर माहेरी असलेल्या पत्नीला घेऊन तो आला होता. दरम्यान तो मनोरुग्ण असल्यामुळे मयताचे नातेवाईकांनी पाठवण्यास नकार दिला होता. परंतु घरात लग्न असल्याचे सांगून पत्नीला सासरी आणले होते.

दरम्यान रविवारी (१२ मार्च) रात्री अडीचच्या सुमारास पत्नी सुनीता अवचर (वय २४) ही झोपेत असताना पतीने पत्नीच्या गळ्यात कमरेचा पट्टा बांधून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच (Police) पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेत विवाहित महिलेस नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. देविदास गरड यांनी तपासून महिलेस मृत घोषित केले. मृत विवाहित महिलेस एक तीन वर्षांचा मुलगा आहे. आरोपी राजू अवचार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT