Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : औषधी व्यावसायिकाला धमकी देत मागितली खंडणी; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात एका औषधी व्यापाऱ्याने याबाबत पोलिसात तक्रार दिली होती

राजेश काटकर

परभणी : परभणी शहरातील एका औषधी व्यवसायिकास अज्ञातांनी फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास नातू आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

परभणी (Parbhani News) जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात एका औषधी व्यापाऱ्याने याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. आरोपींनी त्यांना फोन करून खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास मुलगा, नातवाला जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याला विश्वास बसाव म्हणून त्यांच्या मोबाईलवर फोटो देखील टाकले. या प्रकरणी व्यापाऱ्याने पोलिसात (Police) तक्रार दिली होती. या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपस सुरु केला होता. 

तिघेजण ताब्यात 

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करत करण प्रकाश पाईकराव, विलास बाळासाहेब जोगदंड, राहूल किशनराव पाईकराव या तीन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. याचा अधिक तपस पोलिसांकडून सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT