Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News: बंदुक, शस्त्राचा धाक दाखवुन १६ लाखाचे दागिन लांबविले; घटना सीसीटीव्ही कैद

बंदुक, शस्त्राचा धाक दाखवुन १६ लाखाचे दागिन लांबविले; घटना सीसीटीव्ही कैद

राजेश काटकर

परभणी : पालम शहरातील मोंढा भागात असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्सवर बंदूकधारी चोरट्यांनी मालकाला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करत दुकानातील सोन्य चांदीचे (Gold Silver) दागिन्यासह रोख रक्कम घेऊन पसार (Crime News) झाले आहेत. हे चोरटे मोटरसायकलवर आले होते. (Maharashtra News)

शहरातील मोंढा परिसरात असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्सचे मालक रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून जात होत. याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात बंदूकधारी चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून दुकान मालकांना गुप्तांगावर मारहाण केली. तसेच बंदुकीचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुकानातील सोन्याच्या १६ लाख १० हजार रुपयांच्या सोने– चांदीसह रोख रक्कम अज्ञात व्यक्तींनी चोरून पोबरा केला.

पाठलाग करणाऱ्या नागरीकांनाही दाखविली बंदूक

काही नागरिकांना याबाबत कळताच नागरिकांनी चोरट्याच्या मागे पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी जवळील बंदुक व शस्त्राचा धाक दाखविल्याने चोरटे पळण्यास यशस्वी झाले. या घटनेमध्ये दुकानातील १६ लाख दहा हजाराचा रुपयांचे सोने चांदी व रोख रक्कम घेऊन चोरटे लंपास झाले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कैद झाली असून पालम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT