Parbhani Accident News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News: दुर्देवी! अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कुटूंबावर दुःखाचा डोंगर

Parbhani Road Accident News: घटनास्थळावरून अज्ञात वाहनाचालकाने वाहनाने घेऊन पळ काढला आहे.

Gangappa Pujari

राजेश काटकर, प्रतिनिधी...

Jintur Accident News: जिंतूर तालुक्यातील वरुड (नृ)रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर (Jintur) शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर वरुड नृसिंह, वडाळी रस्त्यावर रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला. किशन विश्वनाथ नवले (वय 29 वर्ष रा.वडाळी शेत सालगडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने तोंडाला, डोक्याला गंभीर मार लागलेला होता. यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला. (Accident News)

सकाळी नातेवाईकांना अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका बोलावून त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला उशिर झाल्याने त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. डॉ अंभुरे,सिस्टर मते,रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे आदींनी त्यांस तपासून डॉ अंभुरे यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, मृताचे शवविच्छेदन रुग्णालयात करण्यात आले असून त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळावरून अज्ञात वाहनाचालकाने वाहनाने घेऊन पळ काढला आहे. मृत युवकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार जिंतूर पोलिसांत अज्ञात वाहनाच्या वाहनाचालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT