Big shock to BJP leader Pankaja Munde Vaidyanath Cooperative Sugar Factory will be auctioned by union bank Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde: मी वडील आणि प्रमोद मामांसोबत रथयात्रेत सहाभागी झाली होती; पंकजा मुंडेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

Pankaja Munde on Ram mandir: बीडमध्येही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं उत्साहात स्वागत करण्याात आलं. या निमित्ताने बीडमधील आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सहभाग नोंदवला.

विनोद जिरे

Pankaja Munde News:

अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं आहे. या निमित्ताने देशभरात राज्यातही उत्साह पाहायला मिळाला. बीडमध्येही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं उत्साहात स्वागत करण्याात आलं. या निमित्ताने बीडमधील आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सहभाग नोंदवला. तसेच यावेळी पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, 'मी दबंग असले तरी प्रचंड संयमी आहे. मी विचाराने निर्णय घेणारी व्यक्ती आहे. जितना बडा संघर्ष, जीत उतनी शानदार होंगी, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राम मंदिराचा संघर्ष संपला, तुमचा संघर्ष कधी संपणार, या प्रश्नावर उत्तर दिलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी वडील गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद मामांसोबत रथयात्रेत सहभागी झाले होते. आज या आनंदाच्या क्षणी त्या दोघांचीही खूप आठवण येत आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

'आज उर भरून आला आहे. आज मला जेव्हा ही प्रतिष्ठापना होत होती, तेव्हा मी खूप भावनिक झाले. आनंद गगनात मावत नव्हता. एवढा मला आनंद होईल हे मला वाटत नव्हतं. लहानपणापासून ऐकून ऐकून राम मंदिर.. राम मंदिर..कारसेवा हे सगळं पाहिलं आहे. आज याची परिपूर्ती झाल्याचे पाहून खूप बरं वाटलं, असं मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

'आज साहेबांची आणि प्रमोद मामांची खूप आठवण आली. ते रथयात्रेत दोघेही होते. त्यांच्यासोबत मी देखील होते. तेव्हा मी लहान होते. तो अनुभव आज आठवला. आज दुःख वाटतंय ते हे याची डोळा याची देही पाहू शकले नाही. मी देखील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. माझा मुलगा बाहेर शिकतोय, तो आला की आम्ही कुटुंबासह दर्शनासाठी जाणार आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

'आज रामाचे राज्य आहे. त्यावेळेस देखील काही वाईट गोष्टी घडत होत्या. आता देखील घडत असणार आहेत. मात्र अशा वाईट गोष्टी संपवण्यासाठी अवतार पुरुष आले. आता देखील काही लोकांच्या अंगामध्ये अवतार यावे लागतात. कार्यकर्त्यांमधील सहानभूती ही माझी खूप मोठी ठेव आहे. रामाला देखील वनवास चुकला नाही. श्रीकृष्णाला देखील त्याच्या जीवनात अनेक निर्णय असे निर्णय घ्यावे लागले. आपण खूप छोटे आहोत, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी बडी होगी, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT