पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेची गोपीनाथ गडावरुन सुरुवात? विनोद जिरे
महाराष्ट्र

पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेची गोपीनाथ गडावरुन सुरुवात?

भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघाली आहे. कराड यांची जन आशीर्वाद यात्रा ही पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड : भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड Bhagwat Karad यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघाली आहे. कराड यांची जन आशीर्वाद यात्रा ही पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. तर याच अनुषंगाने गोपीनाथ गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समाधीस्थळाच्या आवारात नो एन्ट्री दिली आहे. तर फक्त पदाधिकाऱ्यांना प्रवेश आहे. दरम्यान पंकजा मुंडे या नाराज नाहीत त्यांना विरोधी पक्षांनी नाराज केले आहे. त्यांना भाजपकडून लवकरच मुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी मिळू शकते. भविष्यात त्यांना भाजप मोठ पद देईल, असा विश्वास आहे. सुरुवातीला कार्यकर्ते नाराज होते. मात्र पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली असून आता आम्ही भागवत कराड यांच्या स्वागतासाठी आलो आहोत. अशी प्रतिक्रिया गोपीनाथ गडावरुन भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

नव्याने वर्णी लागलेले चार मंत्र्यांची आजपासून राज्यात जनआशिर्वाद यात्रा सुरू;

केंद्र सरकारमध्ये Central Government महाराष्ट्रातील नव्याने वर्णी लागलेले चार मंत्री आजपासून राज्यात जनआशिर्वाद यात्रा Janashirvad Yatra सुरू करत आहेत. यामध्ये बीडमधील परळीतून अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे या यात्रेला सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांत पंकजा मुंडे Pankaja Munde या प्रितम मुंडेंना Pritam Munde मंत्रीपद न मिळल्याने नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसेच याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना आज पंकजा मुंडेंनी खुलासा करत, 'माझी कोणतीही नाराजी नाही आणि आम्ही सर्व मिळून काम करत असल्याचे सांगितले.'

जनआशिर्वाद यात्रेच्या आधी भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री कराड, पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंसह वैद्यनाथ मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी माहिती दिली की, जनआशिर्वाद यात्रा ही देशातील 142 मतदारसंघातून जाणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT