Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde: 'हातभट्टीची पिऊ नका...'; रक्तदान शिबीरात पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Pankaja Munde Advice to Activists: तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा. तसेच खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तुम्ही सर्वांनी चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे. मांस, मच्छी, व्हेजिटेरियन असं काही खा

Ruchika Jadhav

Pankaja Munde News:

"दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही", असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याने पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील रक्तदान केलं. रक्तदान करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी आरोग्याबाबत संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना तंबाखू खाऊ नका असाही सल्ला दिला.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही. मात्र तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा. तसेच खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तुम्ही सर्वांनी चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे. मांस, मच्छी, व्हेजिटेरियन असं काही खा आणि हेल्दी रहा, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

माझा एचबी 14 आहे मी हेल्दी आहे. मला वेळेवर कोणी जेवायला देत नाही तरीसुद्धा मी हेल्दी आहे. मला रक्ताची भीती वाटते, असं देखिल पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे आपल्या विविध वक्तव्यांनी आणि कार्यकर्त्यांमधील संवादाने बऱ्याचवेळा चर्चेत येतात.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Ashok Saraf: अशोकमामा आणि संकर्षण कऱ्हाडे येणार एकत्र; अभिनेत्याने फोटो शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना एकत्रं...'

नांदेडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, ४ जण जागीच ठार

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

SCROLL FOR NEXT