Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Walmik Karad: घाम फुटला, अस्वस्थ वाटू लागलं; वाल्मिक कराडला तुरूंगातच पॅनिक अ‍ॅटॅक

Valmik Karad Suffers Panic Attack in Beed Jail: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्याला बीडच्या जिल्हा करागरामध्ये असून, त्याची प्रकृती दुपारी बिघडली. त्याला पॅनिक अ‍ॅटॅक आल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत असून, त्याला जेलमध्ये पॅनिक अॅटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. कराडला पॅनिक अॅटॅक आल्यानंतर त्याची तातडीने जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली.

वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. दुपारच्या सुमारस कराडला अस्वस्थ वाटू लागलं. त्याची तब्येत बिघडली. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर जेल प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतलं. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी कराडची वैद्यकीय तपासणी केली.

वैद्यकीय तपासानंतर त्याला पॅनिक अॅटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी डॉक्टरांनी कराडला रक्त चाचणी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेतले असून, काही अन्य वैद्यकीय तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत.

रक्त तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यात आले आहेत.

वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड कारागृहातील तुरूंगात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. सीआडीने दोषारोपपत्रातून आरोपींच्या विरोधात कोर्टात अनेक पुरावे सादर केले आहेत. या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT