pavangad madrasa saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला, विद्यार्थ्यांचे शिराेलीत स्थलांतर

गडावर ज्या ठिकाणी कारवाई सुरु आहे तेथे माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Panhalgad Fort :

किल्ले पन्हाळगड (Panhalgad fort) शेजारी असणाऱ्या पावनगड येथील बेकायदेशीर मदरसा हटवण्यास आज (शनिवार) प्रशासनाने प्रारंभ केला आहे. या मदरासामधील 45 विद्यार्थी शिराेली येथील मदरसा येथे पाठविण्यात आले आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maharashtra News)

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पावनगडावरील मदरसाबाबत प्रशासनाकडे तक्रार केली हाेती. सरकारी मुलकीपड जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभा राहिला असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला हाेता.

प्रशासनाने तक्रारीची दखल घेत आज पावनगडावर मदरासा हटविण्याची कार्यवाही सुरु केली. दरम्यान बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरसामध्ये शिकत होते. आजच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या मदरसा मधील 45 विद्यार्थ्यांना रात्रीत (kolhapur) शिरोली मधील मदरसा मध्ये हलवलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मदरसा अरबिया जिणातुल कुराण हा बेकायदेशीर मदरसा असल्याने ताे हटविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने साम टीव्हीला दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT