Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठुरायाच्या दर्शनाने मन सुखावले; पदस्पर्श दर्शनाला सुरवात, भाविकांची गर्दी

Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते.

भारत नागणे

पंढरपूर : तब्बल अडीच महिन्यानंतर आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. आज पहाटे दर्शन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अनेक भाविकांनी विठुरायाचे डोळे भरून दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी मन सुखावल्याची भावना व्यक्त केली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. त्यानंतर‌ आजपासून पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दरम्यान पहाटे पालकमंत्र्यांच्या हस्ते नित्य पूजा करून दर्शनाला (Pandharpur) सुरवात झाली. यानंतर रांगेत उभ्या भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेत विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात साठवून घेतले. 

एकादशीमुळे गर्दी 

पदस्पर्श दर्शनाला आजपासून सुरवात होणार होती. शिवाय ३ जूनला एकादशी असल्याने शेकडो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यामुळे मंदिरात दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली आहे. राज्यभरातून अनेक भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आले आहेत. पदस्पर्श दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT