Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : आता अवघ्या तासाभरात विठ्ठल रुक्मिणी दर्शन; व्हीआयपी दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेची गती वाढली

Pandharpur News : व्हीआयपी दर्शन रांगेतून भाविकांना सोडण्यात येत असल्याने दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना देवाच्या दर्शनाला विलंब होत होता. मात्र आता दर्शन घेणे सोयीचे झाले आहे

Rajesh Sonwane

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे; यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यात आली आहे. दर्शन रांगेची गती वाढली आहे. त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचे पदस्पर्श दर्शन मिळू लागले आहे. लवकर दर्शन मिळाल्याने भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीचे स्वागत केले.

पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. आषाढी वारीच्या निमित्ताने तर भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. दरम्यान मंदिर समितीने आतापर्यंत व्हीआयपी दर्शन सुविधा सुरु केली होती. अर्थात या व्हीआयपी दर्शन रांगेतून भाविकांना सोडण्यात येत असल्याने दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना देवाच्या दर्शनाला विलंब होत होता. मात्र आता दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.

दर्शन रांगेतील घुसखोरी थांबविली 

दर्शन रांगेतून येणाऱ्या भाविकांचे जलद व सुलभपणे दर्शन व्हावे; यासाठी मंदिर समितीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर दर्शन रांगेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दर्शन बारीला जाळीचे गार्ड बसविले आहेत. ऑनलाईन दर्शन सुविधा देखील बंद केली आहे. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना अवघ्या एक ते दीड तासामध्ये जलद व सुलभपणे दर्शन मिळत आहे. लवकर दर्शन होत असल्याने अनेक भाविकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाचे स्वागत केले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाहने नेण्यास मनाई
आषाढी वारी काळात जिल्हाधिकारी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाणाऱ्या चौफाळा ते मंदिरपर्यंत वाहन प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केले आहे. व्हीआयपीच्या वाहनांनी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना वाहनाचा धक्का लागून त्रास होत होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली. त्यांनी आजपासून वारी काळात चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाहन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याचा आदेश काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT