Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam : उजनी धरणावर कृषी पर्यटनासाठी १९ कोटींचा निधी; पर्यटकांसाठी बांधण्यात येणार रिसॉर्ट

Pandharpur News : उजनी धरण मोठे असल्याने याठिकाणी बोटिंगची सुविधा देखील करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता अखेर पर्यटनस्थळ करण्याला मंजुरी देण्यात आली

भारत नागणे

पंढरपूर : राज्यातील सर्वात मोठे असलेल्या सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. याच बरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. यामुळे येथे कृषी पर्यटन विकास करण्यासाठी राज्य शासनाने १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; अशी माहिती माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण मोठे आहे. यामुळे याठिकाणी एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते; या अनुषंगाने विकास करण्यात येणार आहे. अर्थात उजनी धरण मोठे असल्याने याठिकाणी बोटिंगची सुविधा देखील करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर पर्यटनस्थळ करण्याला मंजुरी देण्यात आली असून यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. 

जल पर्यटनासाठी ३३ बोट खरेदी 
कृषी, जल पर्यटनाला चालना मिळावी; यासाठी राज्य सरकारने उजनी धरणावर पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जानेवारी अखेर उजनी धरणामध्ये जल पर्यटन सुरू होणार आहे. ३३ बोटी खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. कृषी पर्यटनासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

पर्यटकांसाठी रिसाॅर्ट बांधण्यात येणार

तसेच याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसाॅर्ट बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आता उजनी धरणावरील पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. अर्थात देवदर्शन घेतल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून हे पर्यटन उत्तम ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT