Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे आता दोन तासात घेता येणार दर्शन; बालाजी, वैष्णो देवीच्या धर्तीवर टोकण दर्शन व्यवस्था

Pandharpur News : विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक उन, वारा, थंडी, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता तासन् तास दर्शन रांगेत उभे राहतात.

भारत नागणे

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन आता अवघ्या दोन तासात मिळणार आहे. यासाठी मंदिर समितीने बालाजी आणि वैष्णो देवीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या माघवरीला प्रायोगिक तत्त्वावर टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. 

पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी, कार्तिकी वारीला येत असतात. या वारीच्या व्यतिरिक्त वर्षभर भाविकांची पंढरीत अलोट गर्दी पाहण्यास मिळत असते. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक उन, वारा, थंडी, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता तासन् तास दर्शन रांगेत उभे राहतात. आषाढी, कार्तिकी यात्रे दरम्यान तर २० ते २२ तास दर्शनासाठी लागतात. तरी देखील भाविक दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. 

भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ कमी करण्याबरोबरच दर्शन रांगेत उभे राहण्याचा भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी मंदिर समितीकडून टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालाजी व वैष्णो देवी येथे असलेल्या व्यवस्थेप्रमाणे टोकण दर्शन व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांचा दर्शन‌ रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होणार आहे. यामुळे अवघ्या दोंन तासांमध्ये विठुरायाचे दर्शन होणार आहे‌. 

फेब्रुवारीपासून होणार सुरवात 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची या संदर्भात नुकताच बैठक झाली. त्यामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात साजरी होणाऱ्या माघ यात्रेपासून प्रयोगीक तत्त्वावर टोकण दर्शन‌ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांना आता अवघ्या दोन तासात लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. दर्शन झाल्यानंतर भाविकांना लवकर पुढच्या देवस्थानावर किंवा माघारी फिरत येणार आहे. 

कंपनीकडून करण्यात आली पाहणी 

दरम्यान मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयानंतर हैदराबाद येथील टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेस या संस्थेच्या वतीने टोकण दर्शन व्यवस्थेसाठी लागणारे स्पाॅटवेअर मोफत देण्यात येणार आहे. या संस्थेच्या वतीने नुकताच येथील दर्शन बारीचा सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये प्रायोगिक तत्वावर हि व्यवस्था सुरु करण्यात काही अडचण होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT