Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Sugarcane Factory: पंढरपुरात रोखली ऊसतोड; संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आक्रमक

पंढरपुरात रोखली ऊसतोड; संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आक्रमक

भारत नागणे

पंढरपूर : यावर्षीच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी. या मागणीसाठी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या दरम्‍यान आज दुपारी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी (Pandharpur) पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात सुरु असलेल्या ऊसतोड रोखल्या आहेत. (Letest Marathi News)

दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनाही सबुरीचा सल्ला देत ऊस वाहतूक करू नये; असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा (Sugar Factory) गाळप हंगाम सुरु झाला आहे. परंतु जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाची पहिली उचल जाहीर केली नाही. यावर्षीच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम भाव 3 हजार 100 रुपये द्यावा; अशी प्रमुख मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे.

आंदोलन पेटण्याची चिन्ह

पंढरपूर येथे दोन दिवसांपूर्वी ऊस परिषदेत देखील हीच मागणी केली आहे. दोन दिवसात पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करा अन्यथा ऊस तोडी बंद पाडू असा इशारा परिषदेने दिला होता. त्यानुसार आज संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस तोड बंद पाडून ऊसदर आंदोलन सुरु केले आहे. ऊसदराच्या मागणीवरुन सोलापूर जिल्ह्यात आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT