Sugar Price Hike Saam tv
महाराष्ट्र

Sugar Price Hike : साखरेच्या दरात प्रति क्विंटल दोनशे रूपयांनी वाढ; गतवर्षीपेक्षा १३ लाख टनाने उत्पादन घटणार

Pandharpur News : यंदा राज्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम मार्च अखेर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखान्याचे प्रयत्न सुरू आहेत

भारत नागणे

पंढरपूर : दिवाळीनंतर प्रति क्विंटल सुमारे चारशे रुपयांनी भाव कमी झाले होते. ऐन हंगामातच साखरेचे भाव घसल्याने कारखानदारांची आर्थिक कोंडी निर्माण झाली होती. मात्र बाजारात घसरलेले साखरेचे दर पुन्हा काही प्रमाणात वधारू लागले आहेत. मागील दोन महिन्यानंतर साखरेच्या दरात प्रती क्विंटल दोनशे रूपयांनी वाढ झाली आहे. दरात वाढ होत असल्याने साखर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.   

यंदा उसाच्या उत्पदनात घट झाल्याचे पाहण्यास मिळाली आहे. यंदा राज्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम मार्च अखेर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखान्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जोरदारपणे सुरु आहे. 

१३ टनाने साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज 

दरम्यान १६ जानेवारी अखेर राज्यातील १८३ साखर कारखान्यांनी सुमारे ४२७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर देशभरातील साखर कारखान्यांनी सुमारे ७५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशात साखरेचे उत्पादन १३ लाख टनांनी कमी होईल असा अंदाज आहे. 

दोनशे रुपयांनी वाढ 

साखरेचे उत्पादन कमी असतानाही बाजारात साखरेला म्हणावा तसा उठाव नसल्याने बाजारात साखरेचे भाव घसरले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल प्रति क्विंटल चारशे रुपयांनी भाव कमी झाले होते. दरम्यान १५ जानेवारीनंतर साखरेच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर मागील दोन महिन्यापूर्वी ३ हजार ३०० रूपयांवर आलेला साखरेचा दर सध्या ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० रूपयांवर पोचला आहे. दोन महिन्यांनंतर दोनशे ते सव्वा दोन रूपयांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT