Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : लाडू प्रसाद विक्रीतून सहा कोटीचे उत्पन्न; विठ्ठल मंदिर समितीच्या ड्रायफूटयुक्त लाडू प्रसादाला मागणी

Pandharpur news : बालाजी देवस्थानच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर समितीने बुंदी लाडू प्रसाद विक्री सुरु केली लाडू प्रसाद खरेदीला उदंड प्रतिसाद मिळू लागला यामुळे मंदिर समितीला चांगले उत्पन्न मिळत आहे

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांकडून सावळ्या विठुरायाच्या लाडू प्रसाद खरेदीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येणार प्रत्येक भाविक याठिकाणी प्रसादाचा लाडू घेत आहे. यामुळे मागील वर्षभरात तब्बल ५ कोटी ८० लाख रुपयांच्या लाडू प्रसादाची विक्री झाली आहे. 

विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येत असतात. वर्षभर भाविकांची रीघ सुरूच असते. दरम्यान येथे येणाऱ्या भाविकांसाठी बालाजी देवस्थानच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर समितीने बुंदी लाडू प्रसाद विक्री सुरु केली आहे. या लाडू प्रसाद खरेदीला उदंड असा प्रतिसाद मिळू लागला आहे. यामुळे विठ्ठल मंदिर समितीला चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळत आहे. 

लाडू बनविण्याची प्रक्रिया नियमित 

विठ्ठल मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अल्पदरात बुंदी लाडू प्रसादाची विक्री केली जाते. मागील वर्षभरात लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला विक्रमी सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मंदिर समितीकडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोष्टीक व चांगल्या गुणवत्तेचा लाडू प्रसाद दिला जातो. मंदिर समितीकडून लाडू प्रसादाची नियमीतपणेतयार करण्याचे काम सुरूच असते. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना हा प्रसाद उपलब्ध होऊ शकतो. 

मंदिर समितीला सहा कोटीचे उत्पन्न 

लाडू प्रसादामध्ये काजू, बदाम, बेदाणा, विलायची या ड्रायफूटचा देखील वापर केला जातो. प्रती लाडू १० रुपये प्रमाणे लाडू प्रसादाची विक्री केली जाते. मागील वर्षभरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सुमारे ५ लाख ८० हजार लाडू प्रसादाची खरेदी केली आहे. लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास ५ कोटी ८० लाख ४२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT