Raju Shetti Saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Pandharpur News : पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी काढण्यात आली. संत नामदेव पायरी येथे पांडुरंगाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून साकडे घातले

भारत नागणे

पंढरपूर : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात असून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील याला विरोध केला आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा; या मागणीसाठी आज पंढरपुरात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

नागपूर- गोवा असा शक्तीपीठ महामार्ग नव्याने केला जात आहे. यास राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे आदेश दिले आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा देखील आंदोलनात सहभाग असून आज पंढरपूरमध्ये महामार्ग विरोधात आंदोलन केले आहे. 

महामार्ग विरोधात काढली दिंडी 
दरम्यान पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी काढण्यात आली. संत नामदेव पायरी येथे पांडुरंगाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून साकडे घातले. या आंदोलनात सर्व पक्षीय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा; अशी मागणी करण्यात आली.

सरकारला सुबुद्धी देण्याचे पांडुरंगाला साकडे  

शक्तीपीठ महामार्गामुळे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला विरोध केला जात आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने राज्यातील जनतेच्या वतीने या सरकारला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी; यासाठी पांडुरंगाला साकडे घातल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना संविधान मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT