महाराष्ट्र

Pandharpur News: 'नो क्लिक, नो रिंग'! विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्टवर, मंदिरात कॅमेरा आणि मोबाईलवर बंदी

Mobile Ban In Pandharpur Temple: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील पंढरपूर मंदिरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

Bharat Jadhav

भारत नागणे, साम प्रतिनिधी

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे. राज्यातील मंदिरात सुरक्षा व्यवस्था अलर्ट करण्यात आलीय. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातदेखील सुरक्षा व्यवस्था अलर्ट करण्यात आली असून तेथे मोबाईल बंदी करण्यात आलीय.

मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मंदिरात मोबाईल नेता येणार नाहीये. मंदिर समितीकडून मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी घालण्यात आलीय. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या बॅग आणि तत्सम वस्तूचे स्कॅनिंग करण्यासाठी मशीन देखील बसवण्यात आल्या आहेत. जे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतील त्यांना मंदिर परिरसरात मोबाईल आणि कॅमेरा वापरता येणार नाही.

पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांना पर्यटकांवर गोळीबार केला. पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे. दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झालाय. या मृतांमध्ये राज्यातील ६ जणांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबत केलेले करार तोडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT