Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

गणेश आगमनाच्या दिवशी झेंडूला दोन रूपये दर

गणेश आगमनाच्या दिवशी झेंडूला दोन रूपये दर

भारत नागने

पंढरपूर : आजपासून गणेशोत्‍सव सुरू होत आहे. या पाश्‍र्वभुमीवर फुलांची मागणी देखील वाढत असते. परंतु, गणेश आगमनाच्या दिवशीच झेंडूला दर मिळत नसल्‍याने (Pandharpur) पंढरपुरातील शेतकऱ्यांनी (Farmer) झेंडूला दर मिळत नसल्याने झेंडू बाजार समितीच्या आवारात फेकून देवून आंदोलन केले. (Pandharpur News Ganesh Festival)

सध्या गणेशोत्सव (Ganesh Festival) सुरू झाला आहे. या काळात झेंडूसह विविध फुलांना मोठी मागणी असते. या दरम्यान फुल उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळतात. मात्र पंढरपुरात या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश आगमनाच्या दिवशीच पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी झेंडूचे भाव पडले आहेत. वीस ते पंचवीस रुपये किलोने विकला जाणारा झेंडू आज पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी चक्क दोन ते तीन रुपये किलोने खरेदी सुरू केली आहे.

फुले फेकून आंदोलन

व्यापाऱ्यांनी अचानक झेंडू फुलाचे दर पडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने व्यापाऱ्यांच्या विरोधात येथील बाजार समितीच्या आवारात झेंडू फेकून आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT