Laxman Hake Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake : महायुतीला ओबीसी पाठिंबा देतील; लक्ष्मण हाके यांचा मोठा दावा

Pandharpur News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही महाविकास आघाडीच्या मराठा नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे

भारत नागणे

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले होते. अर्थात मराठा व ओबीसी हे महायुती विरोधात जातील असे सांगितले जात होते. निवडणुकी निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील ओबीसी महायुतीला पाठिंबा देतील असा मोठा दावा केला आहे. 

मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही महाविकास आघाडीच्या मराठा नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दगडापेक्षा वीट बरी असे म्हणत त्यांनी महायुतीला (Mahayuti) आपला पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे.  

शरद पवार यांचे उमेदवार ज्या मतदारसंघात आहेत. तिथे धनगर, ओबीसी मतदार हा बेस आहे. आम्ही ठरवले तर राजेश टोपे, कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील आणि मोहिते पाटील हे निवडून येऊ शकणार नाहीत; असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. 

शरद पवार कोणत्यातरी बुजगावण्याला होळकरांचे वंशज म्हणून घेऊन फिरत आहेत. ते वंशज नाहीत, होळकरांचे वंशज रॉयल आहेत. ते महाराष्ट्र बाहेर आणि परदेशात वास्तव्यास असतात. असे म्हणत अप्रत्यक्षपणे नाव न घेता राजेभूषण सिंह होळकर हे वंशज नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT