Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठुरायाचे व्हीआयपी दर्शन; मंदिर समितीचा निर्णय

Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. याबरोबरच विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर नवविवाहित जोडपे आपली सुखी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी देवदर्शन घेत असतात

भारत नागणे

पंढरपूर : विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असतात. यातील एक देवस्थान असलेले पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी. देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने याबाबत निर्णय घेत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. याबरोबरच विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर नवविवाहित जोडपे आपली सुखी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी देवदर्शन घेत असतात. यात प्रामुख्याने विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जात असतात. आता पर्यंत या जोडप्याना देखील भाविकांच्या नियमित दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते.

मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना देखील व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे. 

स्थानिक नागरिकांसाठीही वेळ निश्चित 

याबरोबरच पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT