Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

कुकडीच्या पाण्यासाठी करमाळ्यात राष्ट्रवादीचे रास्तारोको

कुकडीच्या पाण्यासाठी करमाळ्यात राष्ट्रवादीचे रास्तारोको

भरत नागणे

पंढरपूर : कुकडी धरणातून करमाळा तालुक्यातील मांगी तलावात पाणी सोडावे; या मागणीसाठी आज (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी (Farmer) रास्‍ता रोको आंदोलन केले. (Pandharpur News NCP)

करमाळा- नगर महामार्गावरील (Pandharpur) जातेगाव येथे रास्ता आंदोलन‌ केले. सुमारे दोन तास आंदोलन सुरू होते. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोळवडी (Kukadi Canal) कुकडी विभागाचे शाखा अभियंता श्री. साळुंखे यांनी ७ ऑगस्‍टपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तर सामुहिक आत्‍मदहन

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी मिळावे अशी मागणी करत जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आठ दिवसांत मांगी तलावात पाणी सोडावे; अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मकरसंक्रातीला खुशखबर मिळणार? खात्यात ₹३००० येण्याची शक्यता

Rare Raj Yoga 2026: 24 वर्षांनंतर या राशींचं चमकणार भाग्य; बुधादित्यसह बनणार ३ दुर्लभ राजयोग, प्रेम जीवनात येणार आनंद

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT