Pandharpur news Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : मुस्लिम तरुणाची अनोखी विठ्ठल भक्ती; एक लाख रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

Pandharpur news : मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किंमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण केला आहे. देव, देश आणि धर्म एक असल्याचा संदेशही सय्यद यांनी आपल्या कृतीतून दिला

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविक भक्त मोठा आहे. लाखोंच्या संख्येने भाविक पंढपुरात दाखल होत असून आलेले भाविक विठुरायाच्या चरणी सोने- चांदीचे दागिने अर्पण करत असतात. तर एका मुस्लिम तरुणाची विठू माऊलीवर असलेली अनोखी श्रद्धा आणि भक्ती पाहण्यास मिळाली आहे. या तरुणाने विठ्ठलावर असलेल्या श्रद्धेतून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण केला आहे.  

लातूर येथील एका मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठल भक्तीचे दर्शन यातून झाले आहे. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किंमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण केला आहे. देव, देश आणि धर्म एक असल्याचा संदेशही सय्यद यांनी आपल्या कृतीतून दिला. मशिदीमध्ये जावून नमाज पठण करणारा गणी सय्यद शुक्रवारी थेट गाभाऱ्यात जाऊन विठुरायाच्या चरणावर लीन झाला. त्याच्या या अनोख्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौैतुक  होत आहे. त्याच्या भक्तीने भारावलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी त्याचा सत्कार केला.

मंदिरासाठी दगड फोडून देण्याचे करतोय काम 
लातूर येथील मुस्लिम समाजातील गणी सय्यद हा देखील एक विठ्ठल भक्त आहे. विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये त्याला मंदिरासाठी लागणारा दगड फोडून देण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे मंदिरात येणे जाणे वाढले आणि तिथेच तो विठ्ठलाचा भक्त झाला. त्यातूनच तो आज धर्म आणि जातीच्या भिंती तोडून विठ्ठलाच्या पायावर एक देवाचा लाडका भक्त म्हणून लीन झाला.

सय्यद यांचे कुटुंबीय जातात कीर्तन ऐकण्यास 
दरम्यान आपण देवाचे काही तरी देणे लागतो; या भावनेतून त्यांनी एक लाख रुपये किंमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. मी मुस्लिम असलो तरी, मी आणि माझे कुटुंबिय भजन, कीर्तन ऐकण्यासाठी जातो. देव एकच आहे. अंत:करणात शुद्ध भाव असला पाहिजे; अशी भावना गणी सय्यद यांनी व्यक्त केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT