Madha Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Madha Vidhan Sabha : आमदार बबनराव शिंदेंना मविआतून उमेदवारीस मोहिते पाटलांचा विरोध; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

Madha News : आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेऊन माढ्यातून उमेदवारीची मागणी केली आहे. आतापर्यंत आमदार शिंदे यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली आहे

भारत नागणे

पंढरपूर : माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. मात्र शिंदे याना माविआ मधून उमेदवारी देण्यास मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि एका कार्यकर्त्यामध्ये झालेल्या संवादाची व्हीडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.  

आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन माढ्यातून उमेदवारीची मागणी केली आहे. आतापर्यंत आमदार शिंदे यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली आहे. बुधवारी देखील आमदार शिंदे यांनी पवारांची भेट घेतली. भेटीनंतर आता माढ्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान माढा तालुक्यातील मानेगाव येथील एका कार्यकर्त्याने थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना फोन करून गद्दारांच्या हाती तुतारी देऊ नका; अशी विनंती करत आमदार शिंदेंना उमेदवारी देऊ नका; अशी मागणी केली आहे. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमच्या कुटुंबाचाही आमदार शिंदेंना (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यास विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माढ्यात राजकीय शह काटशहाचे राजकारण रंगू लागले आहे. 

इच्छुकांची संख्या मोठी 

दरम्यान मोहिते पाटलांच्या विरोधामुळे आमदार शिंदेंना महाविकास आघाडीची उमेदवार मिळण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. शरद पवार गटाकडून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते, शिवतेज मोहिते, अभिजीत पाटील, संजय कोकाटे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. या इच्छुकांनी ही आमदार शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध‌ केला आहे. शरद पवार कोणाला उमेदवारी देतात याकडेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT