Pandharpur Maghi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : माघ यात्रेसाठी अडीच लाख भाविक पंढरपुरात दाखल; पदस्पर्श दर्शनासाठी भलीमोठी रांग

Pandharpur News : पंढरपुरात माघ यात्रेनिमित्ताने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. माघ एकादशी पहाटेची नित्य महापूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार

भारत नागणे

पंढरपूर : प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या माघ यात्रेचा सोहळा उद्या साजरा होत आहे. या माघ यात्रेच्या निमित्ताने राज्यभरातून जवळपास दोन ते अडीच लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी लागलेल्या रांगेत सुमारे ३० ते ३५ हजार भाविक उभे असून दर्शन रांगेसाठी आठ पत्रा शेड उभारले आहेत. 

पंढरपुरात माघ यात्रेनिमित्ताने राज्यभरातून भाविक विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी दाखल होत आहेत. माघ एकादशीची पहाटेची नित्य महापूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उत्साहाला आता उधान आले आहे. सर्वत्र विठु नामाचा जयघोष सुरू आहे. 

माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीने स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा आणि खिचडीची मोफत सोय केली आहे. यात्रा काळात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे.

दीड हजार पोलिसांचा फौजफाटा
वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.‌ माघ वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ४८६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये २ पोलीस उपअधिक्षक, ७१ पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, ८०० पोलीस कर्मचारी व ६०० होमगार्ड तसेच दोन बीडीएस पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

संरक्षणासाठी माउली स्कॉडची स्थापना 

वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी १३ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरात व मंदिर, मंदिर परिसर, दर्शन रांग येथे २६० सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी ६ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT