Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: अडचणी आल्यास संपर्क साधा; खोड भोसे ग्रामपंचायत सदस्याला भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींचे आवाहन

Pandharpur News : अडचणी आल्यास संपर्क साधा; खोड भोसे ग्रामपंचायत सदस्याने घेतली पंतप्रधान मोदींची भेट

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे ग्रामपंचायतचे (Grampanchayat) सदस्य विकास पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान ग्रामीण भागातील विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. (Tajya Batmya)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट व्हावी; यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमीच उत्सुक असतात. अनेक वेळा पंतप्रधानांच्या व्यस्त दौऱ्यामुळे त्यांची भेट होणे अशक्य होते. व्यस्त कार्यक्रम आणि (Pandharpur) दौऱ्यातून ही पंतप्रधान मोदी यांनी विकास पवार यांना भेटीसाठी वेळ दिली. त्यानुसार सोमवारी दुपारी संसद भवनामध्ये त्यांच्यामध्ये भेट झाली. भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याशी ग्रामीण भागातील विविध विषयांवर चर्चा केली.

शेती कर्ज, पाणी, वीज यावर चर्चा 

काही अडचणी आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्याचे ही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज आणि शेती कर्ज पुरवठा या विषयी ही त्यांनी माहिती जाणून घेतल्याचे विकास पवार यांनी सांगितले. एका सर्व सामान्य ग्रामपंचायत सदस्याला पंतप्रधानांनी भेट दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT