Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Farmer Bullock Cart Yatra: आरक्षणासाठी शेतकरीही उतरले आंदोलनात; पंढरपूर ते अंतरवाली सराटी दरम्यान बैलगाडी आरक्षण यात्रा

Pandharpur News : आरक्षणासाठी शेतकरीही उतरले आंदोलनात; पंढरपूर ते अंतरवाली सराटी दरम्यान बैलगाडी आरक्षण यात्रा

भारत नागणे

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज एकवटला असून आक्रमक झाला आहे. तरुण, महिला आंदोलनात सक्रिय झाले असून आता मराठा (farmer) शेतकरी ही आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. दररोज शेतात बैलांसोबत राबणारा बळीराजाने (Pandharpur) पंढरपूर ते अंतरवाली सराटी दरम्यानबैलगाडी आरक्षण यात्रा काढली. (Breaking Marathi News)

मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) वेगवेगळे आंदोलन उभारले आहे. साखळी उपोषण, रास्ता रोको असे आंदोलन राज्यभरात सुरु आहे. दरम्यान या आंदोलनात बळीराजा देखील उतरला असून पंढरपूर तालुक्यातील चळे गावच्या दहा शेतकऱ्यांनी चळे ते अंतरवाली सराटी अशी बैलगाडी आरक्षण यात्रा सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी बैलगाडीतून अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत माघारी येणार नसल्याचा निर्धार 
दरम्यान आज सकाळी दोन बैलगाडीचे पूजन करून शेतकऱ्यांची आरक्षण यात्रा रवाना झाली. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे सर्व शेतकरी चळे ते अंतरवाली सराटीपर्यंतचा २६० किलो मिटरचा‌ प्रवास चार ते पाच दिवसांत पूर्ण करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही; तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही असा निर्धार ही या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

White & Pink Guava : गुलाबी आणि सफेद पेरुमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

Phaltan News : फटलण डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी PSI बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT