महाराष्ट्र

शेतकरी झाला लखपती..झेंडू फुलांना मिळाला उच्‍चांकी भाव

शेतकरी झाला लखपती..झेंडू फुलांना मिळाला उच्‍चांकी भाव

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या खडतर दोन वर्षानंतर भाजीपाला आणि फुलांना चांगले दिवस आले आहेत. दसरा सणाच्या तोंडावर झेंडू फुलांना मागणी वाढल्याने दरातही घसघसीत वाढ झाली आहे. दुष्काळी सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना झेंडू फुल शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. कोरोना संकट काळात आर्थिक दृष्ट्या कुमकुवत झालेल्या धनाजी बाड या तरुण शेतकऱ्याला तर झेंडू शेतीने लखपती बनवले आहे. पाच एकर झेंडू शेतीतून त्यांना ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे. (pandharpur-news-Farmer-became-a-millionaire-flowers-farming-and-got-high-prices)

माळरानावर ठिबकवर झेंडूंची लागवड

पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळाशी लढणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत उपलब्ध पाण्यावर भाजीपाला आणि फुलांचे मळे फुलवले आहेत. लक्ष्मीनगर येथील शेतकरी धनाजी बाड यांनी पाच एकर क्षेत्रावर झेंडूची लागवड केली आहे. बाड यांनी खडकाळ माळरानावर ऑगस्ट महिन्यामध्ये ठिबक सिंचनावर झेंडूची लागवड केली आहे. लागवडीपूर्वी शेणखत आणि त्यानंतर रासायनिक खतांची योग्य मात्रा दिल्याने झेंडूची जोमदार वाढ झाली आहे. लागवडीपासून तीन महिन्यानंतर फुलांची तोडणी सुरु झाली आहे.

आता मिळालाय ५० हजार प्रतिटन दर

नवरात्र, दसरा सणामुळे झेंडूला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. आतापर्यंत पाच टन झेंडूची मुंबईच्या मार्केटमध्ये प्रती टन ५० हजार रुपये दराने विक्री केली आहे. दिवाळीपर्यंत एकरी १५ टनाप्रणाणे सुमारे ७५ टन झेंडूचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. दर टिकून राहिले तर पाच एकर झेंडू फुल शेतीतून ३० ते ३ लाखाचे उत्पन्‍न मिळेल अशी त्यांना अशा आहे. फुलशेतीसाठी त्यांना १० लाख रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वजा जाता केवळ चार महिन्यात फुल शेतीतून २५ लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा फुल शेतीचे व्यवस्थापन पाहणारे कालिदास बजबवळकर यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT