Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पेड दर्शन प्रकरणी खासगी एजन्टविरुद्ध गुन्हा दाखल, तर मंदिरातील दोन सुरक्षा रक्षक निलंबित

Pandharpur News : पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. हि गर्दी लक्षात घेता मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्यात आली होती

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या आषाढी यात्रेदरम्यान व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद करण्यात आली होती. तरी देखील व्हाविकाकडून चार हजार रुपये घेऊन विठ्ठलाचे पेड दर्शन देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका खाजगी एजंट विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंदिरातील दोन सुरक्षा द्राक्षांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

पंढरपूरच्या (Pandharpur News) आषाढी यात्रेनिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. हि गर्दी लक्षात घेता मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्यात आली होती. या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील चेतन काबाडे या भाविकांकडून सुमित शिंदे या खाजगी एजंटाने चार हजार रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वतः भाविकाने (Police) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भाविकाच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुमित शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत शिंदे हा शिंदे सेनाचा पंढरपूर शहर पदाधिकारी आहे.

मंदिरातील दोन सुरक्षा रक्षक निलंबित
या पेड दर्शन दिल्याप्रकरणी (Vitthal Mandir) मंदिरातील दोन खासगी सुरक्षा रक्षकांचा सहभाग असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. यावरून मंदिर समितीने देखील मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मंदिरातील अभिजीत मंडले आणि शुभम मेटकरी या दोन सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या रक्षक एजन्सीला सदरच्या कारवाईची नोटीस पाठविण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना सूचना आल्याबाबतची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT