Pandharpur Maratha Bhavan Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Maratha Bhavan : पहिल्या मराठा भवनाचे मुख्यामंत्रांच्या हस्ते उद्या भूमिपूजन; पंढरपुरात उभे राहतेय राज्यातील पहिले भवन

Pandharpur News : राज्य सरकारने मागणी मान्य करत पंढरपूरमध्ये मराठा भवनासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : मराठा समाजाच्या मागणीनुसार पंढरपूमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठा भवन उभारण्यात येणार आहे. या भावनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. भूमिपूजन झाल्यानंतर भवन उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे. 

मराठा समाजासाठी (Pandharpur) पंढरपुरात मराठा भवन उभे करण्यात यावे; अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने मागणी मान्य करत पंढरपूरमध्ये मराठा भवनासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या या निधीतून सर्व सोयीनियुक्त असे मराठा भवन उभारण्यात येणार आहे. या भवनाच्या बांधकामासाठीचे भूमिपूजन आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी करण्यात येत आहे. यानंतर भवन उभारणीच्या कामाला सुरवात होणार आहे. 

महापूजेनंतर भूमिपूजन 

आषाढी एकादशीच्या दिवशी मराठा भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार असून पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होईल. यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले यांची उपस्थित राहणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'आप'चा राडा

ठाकरे गटानंतर आणखी एक मोठं 'ऑपरेशन'; २५ ते २६ खासदार फुटणार, देशाच्या राजकारणात खळबळ

तुकाराम मुंढेंचा मुंबईत कारवाईचा धडाका; FDA कडून २,५१० लिटर सॉस, ११.१९ लाखांचे एनर्जी ड्रिंक जप्त, व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

Loose Motion : उलट्या- जुलाब होतायत? चुकूनही खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा...

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

SCROLL FOR NEXT