Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: लाडू विक्रीतून एकाच महिन्यात मिळाले दहा लाख; ठेकेदारी पध्दत रद्द करणे मंदिर समितीला फायद्याची

Pandharpur Laddu Sale: लाडू विक्रीतून एकाच महिन्यात मिळाले दहा लाख; ठेकेदारी पध्दत रद्द करणे मंदिर समितीला फायद्याची

भारत नागणे

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या लाडू प्रसादाला भाविकांकडून (Pandharpur) मागणी वाढली आहे. मंदिर समितीने ठेकेदारी पध्दत रद्द करून स्वतः लाडू तयार करून विक्री सुरू केली आहे. या लाडू विक्रीतून मंदिर समितीला एकाच महिन्यात सुमारे दहा लाखांचा नफा मिळाला आहे. (Live Marathi News)

पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला येणारे भाविक हमखास विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. भाविकांना स्वच्छ व चांगल्या दर्जाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ठेकेदाराकडून लाडू तयार करून मंदिर समिती त्याची विक्री करत होते. अलीकडेच मंदिर समितीने (vitthal Rukmini Temple) लाडू तयार करण्याचा ठेका रद्द करून समितीने स्वतः लाडू तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मंदिर समितीकडून तयार केल्या जाणाऱ्या लाडू प्रसादाला आता भाविकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

अडीच लाख लाडू विक्री

दररोज साधारण पाच हजाराहून अधिक लाडूंची २० रूपये इतक्या अल्प दरात विक्री केली जाते. मंदिर समितीने लाडू तयार करण्याचे काम हाती घेतल्यापासून लाडू प्रसादापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाढ झाली आहे. १४ एप्रिल ते २० मे दरम्यानच्या काळामध्ये मंदिर समितीने जवळपास दोन लाख ५२ हजार ९०० लाडू तयार केले. लाडू विक्रीतून सुमारे २५ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून १५ लाख ७० हजार रुपये इतका खर्च आला आहे. खर्च वजा जाता मंदिर समितीला केवळ एका महिन्यामध्येच लाडू विक्रीतून सुमारे दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

SCROLL FOR NEXT