Pandharpur Market Committee Election Results , former mla prashant paricharak, bjp
Pandharpur Market Committee Election Results , former mla prashant paricharak, bjp saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Market Committee Election Results : 25 वर्षाची वाटचाल; पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार प्रशांत परिचारक गट 'अजिंक्य'

भारत नागणे

Pandharpur Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (former mla prashant paricharak) गटाचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर परिचारक गटाने जल्लाेष केला.  (Breaking Marathi News)

पंढरपूरसह अकलूज, कुर्डुवाडी या तीन बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (शनिवार) सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आहे. पंढरपूर येथील बाजार समितीच्या 18 पैकी 5 जागा यापुर्वी परिचारक गटाने बिनविरोध मिळविल्या हाेत्या. 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली.

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने एक हाती वर्चस्व मिळवले. परिचारक गटाने 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत. येथील बाजार समितीवर परिचारक गटाची गटाची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे.

आजच्या विजयाने परिचारक गटावर पुन्हा शेतक-यांनी विश्वास दाखविल्याचे दिसून येते. या निवडणुकीत विरोधी पाटील गटाचा दारूण पराभव‌ झाला आहे. आज निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण करत जल्लोष केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

Hyundai च्या या कार्समध्ये मिळतं CNG इंजिन, 27 किमीचा देतात मायलेज; पाहा लिस्ट

Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

SCROLL FOR NEXT