Pandharpur : अवैध वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जाळल्या!  भारत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur : अवैध वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जाळल्या!

अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. आज तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंढरपूर, भटुंबरे व इसबावी येथे अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई केली. कारवाई दरम्यान चंद्रभागा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी व लाकडी होड्या पेट्रोल टाकून जाळून नष्ट केल्या.

हे देखील पहा :

भटुंबरे, इसबावी व पंढरपुरातील (Pandharpur) चंद्रभागा नदीपात्रातून लाकडी होड्या व बोटीद्वारे अवैध वाळू उपसा करुन त्याची परस्पर विक्री सुरु असल्याची माहिती महसूल (Revenue Department) विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी चंद्रभागा नदी पात्रात जाऊन अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केली.

कारवाई दरम्यान वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ११ बोटी (Boat) नदीपात्रात आढळून आल्या. या सर्व बोटी व होड्याची तोडफोड करुन त्या जाळून नष्ट केल्या. बोटी नष्ट केल्या असल्या तरी बोटीच्या मालकांवर मात्र अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वाळू माफियांवर (Sand Mafia) कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT