crime news Saam TV
महाराष्ट्र

Palghar News : चोरांनी बँकेत चोरी करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळलल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रुपेश पाटील

Palghar Crime News : पालघर बँक ऑफ बडोदा बोईसर शाखेच्या स्टोर रूममधील एक्झॉस्ट फॅनमधील बोगद्यातून प्रवेश करत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघांच्या मुसक्या पालघर पोलिसांनी आवळलल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर शहरात असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेवर काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बँकेतील स्टोर रूममध्ये असलेल्या एक्झॉस्ट फॅनच्या बोगद्यातून प्रवेश केला.

त्यानंतर दोन चोरट्यांनी वीस रुपयांच्या नाण्यांच्या तब्बल पाच बॅग अशा एकूण दोन लाख रुपयांचा दरोडा टाकत चोरटे पसार झाले होते. ही चोरीची घटना बँकेतील स्टोर रूममधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

विशेष म्हणजे या चोरट्यांनी एक रात्र आधी या बँकेवर पहारा देखील ठेवला होता या प्रकरणात अवघ्या काही तासातच पालघर पोलिसांनी एक बावीस तर दुसरा १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात कलम 380 , 457 , 454 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास बोईसर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र स्टोर रूमसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅन ठेवणाऱ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापनाची ही पालघर पोलीस अधीक्षकांनी कान उघडणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT