Wada Rural Hospital Saam tv
महाराष्ट्र

Wada Rural Hospital : धक्कादायक.. मध्यरात्री महामार्गावर महिलेची प्रसूती; वाडा रुग्णालयात उपचाराला नकार

Palghar News : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आब्जा गावातील गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने तिच्या पतीने तिला रात्री वाडा ग्रामीण रूग्णालयात घेऊन आले.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
वाडा (पालघर)
: प्रसूती कडा जाणवत असल्याने कुटुंबीय गरोदर महिलेला प्रसूतीसाठी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र येथील डॉक्टर व नर्सने सदर महिलेला ठाणे जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर महिलेला नेत असताना वाडा- भिवंडी महामार्गावर रात्री महिलेची प्रस्तूती झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आब्जा गावातील गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने तिच्या पतीने तिला रात्री वाडा ग्रामीण रूग्णालयात घेऊन आले. मात्र वाडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी या महीलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी मनाई केली. इतकेच नाही तर ठाणे येथील सिव्हील रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. महिलेला त्रास अधिक होत असल्याने पतीने लागलीच ठाणे नेण्याचा निर्णय घेतला. 

मध्यरात्री रस्त्यावर प्रसूती 

सदर गरोदर महिलेचा पती कैलास भोयू याने १०८ रूग्णवाहीका बोलावून ठाणे येथे घेऊन जाण्यासाठी मार्गस्थ झाला. मात्र रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास या महीलेची प्रस्तूती रस्त्यातच झाली. सदर महीलेला दोन तास या रस्त्यावरच खूप यातना सहन कराव्या लागल्या. प्रसूती झाल्यामुळे तिला ठाणे न नेता पुन्हा वाडा रूग्णालयात पुढील उपचारासाठी आणले.  

पुढील उपचारासाठी घेण्यासही नकार 

प्रसूती झाल्यानंतर सदर महिलेला वाडा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणले असता येथे दाखल करून घेण्यास डॉक्टर व नर्स यांनी नकार दिला. हात जोडून विनंती केल्यावर यांनी महीलेला रूग्णालयात दाखल करून घेतल्याचा सर्व प्रकार केवळ वाडा रूग्णालयातील डॉक्टर व नर्समुळे झाला आहे. यामुळे या रूग्णालयातील डॉक्टर व नर्स यांची चौकशी होणे गरजेचे आहे; असे सांगितले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

SCROLL FOR NEXT