Wada Crime News 
महाराष्ट्र

Wada Crime News : इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला अटक

Wada News : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीला इंस्टाग्रामवरून फेक आयडी बनवून त्यावर दुसऱ्या चार फोटो लावत रिक्वेस्ट पाठविली.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

वाडा (पालघर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून तरुणांकडून गैरवापर केला जात होता. यावरून एका मुलीशी ओळख करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्यास सुरवात केली. याबाबत पोलिसात दाखल तक्रारीवरून ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी सिन्नरमधून अटक केली आहे. 

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीला इंस्टाग्रामवरून फेक आयडी बनवून त्यावर दुसऱ्या चार फोटो लावत रिक्वेस्ट पाठविली. यानंतर सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चांगली ओळख झाल्यानंतर तिच्याकडून फोटो व काही व्हिडीओ मागवले. तेच फोटो व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडून आणखीन नग्न फोटो व व्हीडीओ मागविले. यानंतर तिला (Crime news) तरुणांकडून ब्लॅकमेल केले जात होते. 

सिन्नरमधून तरुणाला अटक 

दरम्यान सदर प्रकाराबाबत तक्रार वाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपास पथक तयार करून आरोपी प्रेम राजेश सोनी याला सिन्नर येथून अटक केली आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याकडून तपास केला असता त्यांने सर्व फोटो व व्हीडीओ इतर कोणाला तरी पाठवले असल्याची कबुली दिली आहे. तर आणखी किती मुलींना फसवले आहे का? याचा तपास वाडा पोलिस करत आहे. तरुणींना इंस्टाग्राम वापर पासून सावधान रहाण्याचे आव्हान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT