Palghar news Saam tv
महाराष्ट्र

Palghar news : मुंबई- अहमदाबाद महामार्ग रोखला; पेसा भरतीच्या मागणीसाठी आंदोलन

Palghar News : पालघरच्या चारोटी येथे बारा वाजताच्या सुमारास आमदार विनोद निकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली २७ पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको केला

रुपेश पाटील

पालघर : पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली आज मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. साधारण दोन तास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

पालघरच्या (Palghar) चारोटी येथे बारा वाजताच्या सुमारास आमदार विनोद निकोले आणि आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली २७ पेक्षा अधिक संघटनांनी हा रास्ता रोको (Rasta Roko) केला. या रास्ता रोकोमुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मागील अनेक वर्षांपासून पेसा भरतीचा प्रश्न सरकारला सोडवता येत नसून सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक लावून तोडगा काढावा; अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसार यांनी केली. 

तर अनेक पात्र उमेदवार असताना देखील सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच राहणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. बारा वाजता या रास्ता रोकोला सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT