Mokhada News Saam tv
महाराष्ट्र

Mokhada News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या; नागरिकांचा मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Palghar News : रात्री उशिरा झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी शोध घेतला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

मोखाडा (पालघर) : सात वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला जीवे मारल्याची घटना मोखाडा तालुक्यात घडली होती. या घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या; या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे.

पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रविवारीच्या मध्यरात्री अत्याचार पीडित मृत मुलीच्या घराच्या बाजूला वाढदिवस साजरा केला जात होता. याच वाढदिवसाला मुलगी गेली असताना तिला संशयिताने निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. रात्री उशिरा झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी शोध घेतला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत (Crime News) आढळून आली. तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ग्रामस्थ संतप्त 

सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करत मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला होता. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता. याच दरम्यान आज संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी; या मागणीसाठी मोखाडा शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी

Blood Pressure: BPच्या रुग्णांनी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Mishti Doi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांना करा खूश; झटपट घरी बनवा बंगाली स्टाइल मिष्टी दोई

Success Story: कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; अवघ्या २३व्या वर्षी IAS; कस्तुरी पांडा यांचा प्रेरणादायी प्रवास

Rain Alert : राज्यावर अवकाळीच संकट! पुढील ४८ तास महत्त्वाचे, ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT