Palghar Crime Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime : सराफ व्यावसायिकाकडून ७९ महिलांची फसवणूक; सव्वा कोटीचे दागिने घेऊन पसार, राजस्थानमधून घेतले ताब्यात

Palghar News : घडल्या प्रकाराबाबत सदर महिलांनी पालघर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता

रुपेश पाटील

पालघर : महिलांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत समोर आले आहेत. या दरम्यान सर्फ व्यावसायिकाने दागिने बनवून देण्याच्या नावाने ७९ महिलांना तब्बल एक कोटी २६ लाखांचा गंडा घालून पसार झाला. या प्रकरणी सराफ व्यावसायिकाला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले आहे. 

पालघरच्या (Palghar) सफाळे येथे गणेश ज्वेलर्स नावाने सराफ दुकान सुरू केले. यानंतर नव्याने दागिने बनवून देतो असं सांगत या संशयित आरोपीने सफाळेसह परिसरातील ७९ महिलांचे तब्बल एक कोटी २६ लाख रुपये किमतीचे दागिने घेतले. हे सर्व दागिने घेऊन हा सराफ व्यावसायिक पसार झाला होता. घडल्या प्रकाराबाबत सदर महिलांनी पालघर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून (Crime News) पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. 

याच दरम्यान एका संशयित आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली होती. मात्र सदर प्रकरणातील मुख्य आरोपी मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. या आरोपीला देखील मोठ्या शिताफीने पालघर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT