Mokhada Crime Saam tv
महाराष्ट्र

Mokhada Crime : संतापजनक! ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून जीव घेतला, मृतदेह निर्जनस्थळी फेकला

Palghar News : वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख

मोखाडा (पालघर) : मुलींवरील अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असून पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पोलिस ठाण्यात हद्दीत अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. यात सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.

मोखाडा तालुका पोलीस (Police) स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी म्हणजे रविवारी संध्याकाळी मुलीच्या घराच्या बाजूला वाढदिवस साजरा केला जात होता. याच वाढदिवसाला मुलगी ये- जा करत होती. मात्र वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही. (Crime News) म्हणून रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी तिचा शोध सुरु केला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.  

यानंतर घरच्यांनी सदर मुलीला लागलीच रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर प्रकरणी मोखाडा पोलीसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीपासूनच मोखाडा पोलीस ठाण्यात गर्दी झाली असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर जव्हारचे उपाधिक्षक गणपत पिंगळे घटनास्थळी दाखल होत संपूर्ण तपासाची सूत्रे आपल्या हातात घेत तपासाला सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT