Palghar Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Crime : महाराष्ट्राला हादरवणारी घटना; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पालघरच्या माहीम भागातील घटना

रुपेश पाटील

Palghar Crime News : पालघरमधून (Palghar) एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या ११ पैकी ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य ६ आरोपींचा शोध सातपाटी सागरी पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे. (PalgharLatest Crime News)

पालघर जिल्ह्यातील माहीम परिसरातील पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा आरोपींचा शोध सध्या सातपाटी पोलीस घेत आहेत. ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT