Dahanu Crime News रुपेश पाटील
महाराष्ट्र

Palghar Crime Video: डहाणू रेल्वे स्थानकाबाहेर चाकू घेऊन माथेफिरुची दहशत; पोलिसांवरही केला जीवघेणा हल्ला

Dahanu Crime News: विशेष म्हणजे त्याने पोलिसांवरही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

रुपेश पाटील, पालघर

Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरच्या (Palghar) डहाणू रेल्वे स्थानकाजवळ भर गर्दीत हातात पट्टा आणि सुरा घेऊन फिरणाऱ्या एका माथेफिरूने गोंधळ घातला. विशेष म्हणजे त्याने पोलिसांवरही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. (Palghar Latest News)

काल, रविवारी दुपारच्या सुमारास डहाणू रेल्वे स्थानकाजवळ भर गर्दीत एक माथेफिरू हातात सुरा आणि पट्टा घेऊन दहशत (Crime) पसरवण्याचा प्रयत्न करत होता. या माथेफिरूच्या भीतीमुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या काही बाईकस्वारांचे अपघातही झाले.

पाहा व्हिडिओ -

यानंतर डहाणू पोलीस (Dahanu Police) घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न करताना या माथेफिरूने पोलिसांवरही हल्ला चढवला. मोठ्या झटापटीनंतर या माथेफिरूला डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT