Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Crime News : माथेफिरूकडून दोन सख्ख्या भावांची हत्या; धक्कादायक घटनेनं पालघर हादरलं

Crime News: पालघरमधील तारापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुडण येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन भावांची हत्या करून आरोपी कुरण खाडीमधील पाण्यात लपून बसला होता.

Ruchika Jadhav

रुपेश पालघर

Palghar :

पालघरमधील (Palghar) कुडण येथे एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमराव पाटील (72) आणि मुकुंद पाटील (80)या दोघांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपी तेथून पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात फरार झालेल्या आरोपीस पकडण्यास पालघर पोलिसांना यश आलं आहे. पालघरमधील तारापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुडण येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन भावांची हत्या करून आरोपी कुरण खाडीमधील पाण्यात लपून बसला होता.

नेमकं काय घडलं?

कुडण येथे राहणाऱ्या भिवराव आणि मुकुंद पाटील यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालत माथेफेरूने बाजूला राहणाऱ्या घरावर देखील हल्ला केला होता. त्यावेळी रुपेश पाटील व त्याचे वडील या दोघांनी पुढचे दार बंद केले आणि ते मागच्या दाराने बाहेर आले. तसेच बेसावध असणाऱ्या या मारेकऱ्याच्या हातातील कुदळ हातातून खेचून घेतली.

त्यानंतर त्यांनी गावाबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत पलायन केले. गावातील नागरिकांनी त्याला कुरण खाडीच्या दिशेने जाताना पाहिले होते. तो येथेच लपून बसला असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी खाडीमध्ये उतरून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी व नागरिकांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याला पकडले. हल्ला करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत. एकाच वेळी गावातील दोन सख्खा भावांची हत्या झाल्याने गावासह पालघर जिल्हा हादरून गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT