Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Crime : चिमुकल्यांच्या डोळ्यांदेखत त्याने पत्नीला संपवलं; थरकाप उडवणारी घटना

पतीने आपल्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यासमोरच हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Crime News : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणामुळे गंभीर गुन्हे घडत आहे. यामध्ये पती-पत्नी भांडण, जमिनीचे वाद यासारख्या घटना सर्वाधिक आहे. पालघर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली.  (Latest Marathi News)

पती इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत:वर सुद्धा वार करून घेतले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बोईसर येथील टिमा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. धक्कादायक (Crime News) बाब म्हणजे आरोपी पतीने आपल्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यासमोरच हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ममता देवी प्रसाद (वय ४० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचे नाव असून सीताराम प्रसाद (वय ४५) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. अंगावर काटा आणणारा हा धक्कादायक प्रकार बोईसरच्या दांडी पाडा येथे घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मृत महिलेचा मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती सीताराम याचा पत्नी ममता देवी हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद सुरू होते.

दरम्यान, मंगळवारी सीताराम आणि ममता यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेले की सीताराम याने पत्नी ममता हिची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: वर सुद्धा वार केले. या घटनेत ममता हिचा जागीच मृत्यू झाला असून सीताराम गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बोईसर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT