Bus Accident In Boisar Depot saam tv
महाराष्ट्र

Palghar Bus Accident: बोईसर आगारात बसचा भीषण अपघात; भरधाव बस संरक्षण भिंतीला धडकली

Bus Accident In Boisar Depot: बोईसर बस आगारात भरधाव बस संरक्षण भिंतीला धडकून मोठा अपघात घडलाय. यात चालक गंभीर जखमी झालाय.

Bharat Jadhav

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

बोईसर बस आगारात बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस आगाराच्या संरक्षण भिंतीला धडकली. या अपघातात चालक आदिनाथ कुटे गंभीर जखमी झालेत. जखमी बस चालकावर बोईसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

बसचा अपघात घडल्यानंतर आगारात बघ्याची मोठी गर्दी जमली होती. बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचं दिसून आले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महामंडळाच्या बसेसच्या अपघाताच्या घटना वारंवार होताना दिसत आहे. नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्यानं अपघात होत असल्याचं निदर्शनात येत आहे. जिल्ह्यात एसटी अपघातांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

चालक आदिनाथ कुटे हे दोन आठवड्यांपूर्वीच कामावर रुजू झाले होते. सोमवारी दुपारी ते बस देखभाल विभागातून बस पार्किंग क्षेत्रात नेत होते. त्यावेळी त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस थेट हिरकणी कक्षावर आदळली. अपघातावेळी आगार परिसरात १०० हून अधिक प्रवासी उभे होते. सुदैवाने जिथे बस आदळली त्या ठिकाणी प्रवासी नसल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT