Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शनाची सक्ती नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik News : श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान याचिकेसंदर्भात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. मंदिर विश्वस्तांनी सुरू केलेले सशुल्क दर्शन कोणत्याही भाविकाला सक्तीचे नाही असे यात म्हटले आहे. भक्त त्यांच्या इच्छेने झटपट आणि जवळून दर्शनाचा मार्ग निवडू शकतात. असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तसेच पुढील सुनावणीत याचिका दाखल करणाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

नाशिकमधील ( Nashik) त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. पुरातन वास्तूचा दर्जा असलेले हे मंदिर पेशवेकालीन आहे. त्यामुळे नेहमीच मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशात अनेक मंदिरांमध्ये भाविकांबरोबर गैरव्यवहार झाल्याचे समोर आलेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील असाच प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. यात भक्तांकडून दर्शनासाठी घेतल्या जाणाऱ्या २०० रुपयांच्या शुल्कावर आक्षेप घेतला गेला आहे.

सदर मंदिराची जागा ही शासनाची आहे. त्यामुळे मंदिराची देखभाल आणि कारभार सुरळीत चालवण्याची जबाबदारी येथील विश्वस्त मंडळावर सोपवलेली आहे. मात्र विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शनाची सुविधा सुरू केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar) दर्शनासाठी नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे ज्या भाविकांना अगदी जवळून आणि झटपट दर्शन घ्यायचे आहे अशांसाठी सशुल्क दर्शानाचा मार्ग तयार करण्यात आला. यात उत्तर दिशेने असलेल्या दारातून दर्शन दिले जाते. तसेच यासाठी २०० रुपये आकारले जातात.

मंदिरात सुरू असलेला हा प्रकार ललित शिंदे (देवस्थानचे माजी विश्वस्त) यांना मान्य नव्हता. सशुल्क दर्शनाला त्यांनी विरोध केला. त्यांचे असे म्हणणे आहे की, विश्वस्त मंडळाने त्यांच्याकडे असलेली जबाबदारी नीट पार पाडावी. सशुल्क दर्शनामुळे ते भाविकांमध्ये भेदभाव करत आहेत. तसेच अनेक भक्तांची यात लूट होत आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन रद्द करण्याची मागणी करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अशात सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी म्हटले आहे की, मंदिर विश्वस्त सरसकट सर्व भक्तांना सशुल्क दर्शन घेण्यास सांगत नाही. इच्छूक भक्तांसाठी ही सोय आहे. तसेच सशुल्क दर्शनाचा अधिकार नसल्याचे कुठे लिहिले आहे? सशुल्काचा हा निर्णय भक्तांमध्ये दुजाभाव करणारा कसा? अशा सर्वच प्रश्नांवर ३० नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

Jio Recharge: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

SCROLL FOR NEXT