Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडच्या पाटोदा तालुक्यात शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

बीडच्या पाटोदा तालुक्यात शंकी गोगलगायमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

विनोद जिरे

Beed Farmer Problems: बीडच्या पाटोदा तालुक्यात शंकी गोगलगायमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उगवून आलेल्या कोवळ्या सोयाबीन पिकाला गोगलगाय खावून टाकत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अगोदरच जुलै महिना अर्ध्यावर आला असताना अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यातच गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. (Latest Marathi News)

पाटोद्यात मागील 3 ते 4 वर्षांपूर्वी शंखी गोगलगायींचे प्रमाण अल्प होते. मात्र, यावर्षी हे प्रमाण वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. शंखी गोगलगाय सोयाबीनचे कोवळे कोंब खात असल्याने रोपे वाया जात आहेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी गोगलगायींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

दुबार पेरणीच्या भीतीने 30 वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

पीककर्ज काढून पेरणी केली. मात्र, पाऊस (Rain) पडत नसल्यामुळे दुबार पेरणी करावी कशी? या विवचनेतून बीडच्या कुंबेफळ येथे एका 30 वर्षीय शेतकऱ्याने घराच्या दारासमोर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. महेश भागवत थोरात रा. कुंबेफळ ता. केज असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

मयत महेश यांच्या आई-वडिलांच्या नावे जवळपास 4 एकर जमीन आहे. पाऊस कमी झाल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळं याच विवंचनेत त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या (Beed) केज पोलीस (Police) ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT