उस्मानाबाद: मुलाची हत्या प्रकरण, पोलिसांच्या मदतीनेच खुनातील मुख्य आरोपी मोकाट  कैलास चौधरी
महाराष्ट्र

उस्मानाबाद: मुलाची हत्या प्रकरण, पोलिसांच्या मदतीनेच खुनातील मुख्य आरोपी मोकाट

मागील आठ दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील ५ वर्षीय ओम बागल या मुलाची हत्या करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील आठ दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील ५ वर्षीय ओम बागल या मुलाची हत्या करण्यात आली होती. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील मुलाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. मात्र, या हत्येत या १७ वर्षीय मुलाच्या आई वडिलांचा देखील समावेश असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे देखील पहा-

त्या अनुषंगाने ओम बागल याची आई मनीषा बागल आणि वडिल मनोज बागल यांच्या सहइतर नातेवाईकांनी पोलिस (Police) अधिक्षक निवा जैन यांना निवेदन (Statement) दिले आहे. १६ डिसेंबर दिवशी दुपारनंतर ओम बागल हा गायब झाला होता, त्याचा शोध घेतल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दिलीप बागल याच्या घरात ओमचा मृतदेह आढळून आला होता. यामध्ये ओमची हत्या (killing) करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे ओम बागलची हत्या ही तिघांनी मिळुन केली असल्याचा आरोप (Allegations) नातेवाईकांनी केला आहे. मात्र, यात पोलिस आरोपींना (accused) सहकार्य करत असून मुख्य आरोपी दिलीप बागल आणि वंदना बागल यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई (Action) करण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे. हे दोन्ही आरोपी बाहेर असल्याने आमच्या कुटुंबावर (family) दबाव येत असून केस मागे घे असे म्हणत आहेत. त्यासोबतच घटना घडून ८ दिवस झाले, तरी अद्याप पोलिसांनी एफ.आय.आर (FIR) कॉपी आम्हाला दिली नाही. या खुनातील प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT